होणार सून मी ह्या घरची ही २०१३ ते २०१६ दरम्यान झी मराठीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक कौटुंबिक मालिका आहे. मालिकेत तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथा मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिली होती. मालिकेची कथा श्रीरंग उर्फ श्री भोवती फिरते, जो त्याची आजी आणि पाच आयांसोबत राहतो. जेव्हा श्रीने जान्हवीशी लग्न केले तेव्हा तिला सहा सासूंसोबत जुळवून घेताना त्रास होतो.
या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे ही महाराष्ट्राची महामालिका लॉकडाऊनमुळे झी मराठी वाहिनीवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची जोडी फार प्रसिद्ध झाली. दोघांनी पुण्यात खऱ्या आयुष्यातही लग्न केले. पण, नंतर २०१६ मध्ये घटस्फोट झाला.
२०१३मध्ये झी मराठी अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्यात मालिकेने विविध श्रेणींमध्ये एकूण ११ पुरस्कार जिंकले.तेजश्री प्रधान हिने मालिकेत तीन पदर असलेले मंगळसूत्र घातले होते. ते एवढे लोकप्रिय झाले की ते मंगळसूत्र एक फॅशन बनले. "जान्हवीचे मंगळसूत्र" म्हणून त्याला प्रचंड मागणी आली. EBay या ऑनलाइन बाजारात ते विक्रीसाठी ठेवले गेले.
होणार सून मी ह्या घरची
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?