कादंबरी कदम-देसाई (१३ ऑक्टोबर १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी नाटकांत, हिंदी-मराठी चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.
कादंबरी कदम मुंबईच्या गोरेगाव विद्यामंदिरात शिकत होत्या. वयाच्या तिसऱ्या वर्षी कादंबरीमधील अभिनयाचे गुण दिसून आले. त्या वयात तिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. जरा मोठ्या झाल्यावर त्यांनी विजय तेंडुलकरच्या एका मराठी नाटकात भूमिका केली होती. तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती तीन बहुरानियॉं या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने कभी सौतन कभी सहेली आणि कहता है दिल ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने झी मराठीवरील अवघाचि संसार या मालिकेतही काम केले होते. मराठीमधील टॅक्स फ्री या कार्यक्रमाची ती सूत्रसंचालक होती.
कादंबरी कदम
या विषयावर तज्ञ बना.