मनोज जोशी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मनोज जोशी

ओंकार जोशी ऊर्फ मनोज नवनीत जोशी (जन्म : गोरेगांव, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, १ जून, १९५५) हे एक भारतीय चित्रपट अभिनेता व मराठी नाट्यकलाकार आहेत. मूळ गुजराती असलेल्या मनोज जोशी यांचे शिक्षण मराठीत झाले.

मनोज जोशी ह्यांच्या खापर खापर पणजोबांपासून त्यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यातील (पूर्वीचा कुलाबा जिल्हा) गोरेगावमध्ये २०० हून अधिक वर्षे राहत आहेत म्हणून ते मराठी. त्यांचे वडील नारदीय कीर्तनकार होते. मनोज जोशी मुंबीतील भारती विद्या भवनमध्ये संस्कृत शिकले. त्यांनि प्रतिमा मुद्रण शास्त्रातला एक व्यावसायिक अभ्यासक्रम पुरा केला आहे. चित्रकला शिकून त्यांनी काही नियतकालिकांसाठी पृष्ठ मांडणीचे काम केले आहे. हे सर्व करीत असतानाच मनोज जोशी यांनी सत्यदेव दुबे, विजया मेहता, आणि शफी इनामदार यांच्यासारख्ह्या नाट्यकर्मींकडून नाट्यकलेचे मर्म आत्मसात केले.

त्याने मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. कांति मढियाच्या ताक धिना धिन या गुजराती नाटकात मनोजने १९८६ साली पहिली भूमिका केली. विवेक लागू यांचे सर्वस्वी तुझीच (१९९५) हे मनोज जोशी यांचे मराठीतले त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. त्यानंतर मनोज जोषींनी अनेक मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी आणि इंग्रजी नाटकांमधून भूमिका केल्या.

मनोज जोशी यांनी विजय तेंडुलकर यांचे ’घाशीराम कोतवाल’ हे नाटक गुजरातीत अनुवादित केले आहे.

मनोज जोशी हे तो दिवंगत अभिनेता राजेश जोशी याचा भाऊ आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या दशक्रिया या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. १९९८पासून २०१७ पर्यंत त्यांनी ६०हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, त्यांतल्या बऱ्याचशा भूमिका विनोदी आहेत.

मनोज जोशी यांनी चाणक्य हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली होती.

चरित्र भूमिका ही मनोज जोशी यांची खास पसंती आहे.

गाजलेला डायलॉग : असतील असल्या बाया तर रात्र गेलीच वाया (नारबाची वाडी)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →