मोहन जोशी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मोहन जोशी

मोहन विष्णू जोशी (जन्म : बंगळुरु, १२ जुलै १९५३) हे रंगमंचावरील आणि चित्रपटातील एक प्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. (इ.स. २०१५)

मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. पहिले नाटक ’टुणटुण नगरी खणखण राजा’ हे होते. नाटके करणे सुरू असताना ते बी.कॉम. झाले. पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौऱ्यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला.

ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीसाठी मुंबईत आले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक होय. त्यापूर्वी त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते. कॉमर्स कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.

नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वतःचा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →