जयंत बेंद्रे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जयंत बेंद्रे (२३ डिसेंबर, इ.स. १९५१ - २२ मार्च, इ.स. २०१५:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक आणि लेखक होते.

बेंद्रे यांचे शिक्षण अहमदनगर येथे झाले. त्यांनी एम.कॉम. ही पदवी मिळवली होती. त्यांच्या वडिलांनीही नाटकांतून कामे केली होती. कॉलेजमध्ये असताना रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना अभिनेते मोहन जोशी यांच्यासह त्यांनी काही औद्योगिक नाट्य स्पर्धा केल्या. बेंद्रे यांनी मोरूची मावशीनाटकात काम केले होते. जयंत बेंद्रे हे विविध नाट्य संस्थांशी जोडलेले होते. त्यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांबरोबरच मराठी चित्रपट आणि चित्रवाणी मालिकांतूनही भूमिका केल्या होत्या.

मोहन जोशी यांच्या नटखट नट-खट या ५०० पानी आत्मचरित्राचे शब्दांकन जयंत बेंद्रे यांनी केले होते. वेगळ्या आकृतीबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले. त्यांनी अन्य विषयांवरही लेखन केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →