विश्वनाथ भालचंद्र देशपांडे (३१ मे, इ.स. १९३८ - ९ मार्च, २०१७) हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. त्यांनी मराठी नाट्यसृष्टीबद्दल लिखाण केले. त्यांनी मराठी नाट्यकोश या सुमारे १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन केले. देशपांडे यांची २०१५ सालापर्यंत अंदाजे ५१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यांपैकी २५ पुस्तके नाट्यविषयक आहेत.
‘नाटकातली माणसं‘’, ‘‘गाजलेल्या भूमिका’‘, ‘‘नाटक नावाचं बेट‘’, ‘‘निळू फुले‘‘, ‘‘नाट्यभ्रमणगाथा‘’ , ‘‘निवडक नाट्यप्रवेश : पौराणिक’‘, ‘‘वारसा रंगभूमीचा’‘, ‘‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’‘ ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत. देशपांडे यांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेले अनुभव त्यांनी ‘‘नाट्यभ्रमणगाथा’‘ पुस्तकातून लिहिले आहेत. त्यांनी नाट्य-साहित्य क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींबरोबर त्यांनी काम केले तसेच त्यांची मैत्री होती. यांत वि.वा. शिरवाडकर, पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग यांचा समावेश होता.
विश्वनाथ भालचंद्र देशपांडे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.