डॉ प्रदीप आगलावे हे एक ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत , संशोधक आणि वक्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देखील परिचित आहेत. त्यांचा जन्म २६ जानेवारी १९६० रोजी सेवाग्राम, ता. जिल्हा वर्धा. येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नागोरावजी दमडूजी आगलावे तर,आईचे नाव निम्बोणाबाई नागोराव आगलावे असे आहे. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचा आवडता छंद- वाचन व मनन करणे. घरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. डॉ. आगलावे हे नागपूर विद्यापिठातील डॉ. आंबेडकर पदव्युत्तर विभागाचे एकूण २३ वर्ष प्रमुख होते. तसेच ते डॉ. आंबेडकर अध्यासनाचे देखील प्रोफेसर आणि प्रमुख होते. २०२१ पासून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र- साधने प्रकाशन समितीचे सदस्य-सचिव आहेत. त्यांच्या कार्यकाळात डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे चा २३ हा नवीन खंड प्रकाशित झाला. ‘जनता’ चे एकूण ९ खंड, इंग्रजी खंड २,४ ,६, ९ आणि १३ या खंडांचा मराठी अनुवाद आणि १६ खंडाच्या नवीन आवृत्त्या इतके प्रचंड साहित्य डॉ. प्रदीप आगलावे यांनी केवळ साडेतीन वर्षात महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित केले. त्यांची देशातील तसेच विदेशातील अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान इत्यादी देशातील विद्यापिठात भाषणे दिलीत.
डॉ. प्रदीप आगलावे
प्रदीप आगलावे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.