योगीराज बागूल हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघाडीचे जेष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि लेखक आहेत. संशोधनात्मक वैचारिक ग्रंथनिर्मिती करून त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे चरित्रे आणि आत्मचरित्राची मराठी वाचकांनी दखल घेतली आहे. ते अतिशय गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांनी आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम करून आणि माळाला व गायरानात गुरे राखत शालेय शिक्षण तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.
योगीराज बागूल यांचे शालेय शिक्षण त्यांच्या जन्मगावी खंडाळा (या.वैजापूर, जि.औरंगाबाद) येथील जिल्हापरिषद हायस्कूलमध्ये झाले तर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथील नागसेन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातून पुर्ण केले. साहित्याला आकार देण्यासाठी प्रा.प्र.ई. सोनकांबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनभिज्ञ पैलू आणि त्यांचे अजूनही माहित नसलेले कार्य शोधणे हा बागूल यांचा विशेष आवडीचा आणि अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही वाङमय प्रकाराला (आत्मचरित्र, चरित्र, कादंबरी, कविता आणि संपादन) स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यांची महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समिती, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण (बार्टी) ग्रंथ निवड समितीसह वेगवेगळ्या महत्त्वाच्या समितींवर सदस्य आणि सल्लागार म्हणून. निवड झाली आहे.
राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम) येथे व्यवस्थापक (Manager) पदावर नोकरी करीत आहेत.
योगिराज बागुल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!