प्रतिमा जोशी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

प्रतिमा जोशी (२३ डिसेंबर, १९५९ ) या महाराष्ट्र टाइम्सच्या माजीपत्रकार असून, सामा​जिक प्रश्नांवर सक्रिय असलेल्या मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. विद्यार्थीदशेपासून त्या समाजवादी चळवळीत सक्रिय सहभागी झाल्या. महाविद्यालयात असताना त्यांनी राष्ट्र सेवा दलात काम केले. त्यानंतर युवक क्रांती दल, एस. एफ. आय., संघर्ष वाहिनी आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळींमध्ये त्या सहभागी झाल्या. नामांतराच्या लढ्यातील सहभागामुळे त्यांना पंधरा दिवसांचा तुरुंगवासही झाला. मुंबईच्या कामाठीपुर भागात त्यांनी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या प्रश्नासंदर्भात महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्य केले. कामाठीपुरा परिसरातील स्त्रिया, लहान मुले यांच्यासाठी शिक्षण, आरोग्य, कायदेविषयक अशा कामात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. १९९० पासून त्या महाराष्‍ट्र टाइम्‍समध्‍ये प्रिन्सिपल करस्‍पॉन्‍डट पदावर कार्यरत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →