लक्ष्मण माने

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लक्ष्मण बापू माने (जन्मः १ जून, १९४९) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषेतील लेखक आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र हिंदी शिवाय इंग्रजी, गुजराती, तमिळ, फ्रेंच, मल्याळम आदी भाषांतूनही अनुवादित झाले आहे.

माने हे भारतातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करतात. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार ते लेखनातून व्यक्त करतात. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →