पोर्तुगाल राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. संघाचे प्रशासन पोर्तुगीज क्रिकेट फेडरेशन करते. पोर्तुगाल १९९६ मध्ये आयसीसीचा संलग्न सदस्य झाला आणि २०१७ मध्ये त्याला सहयोगी सदस्यत्व मिळाले.
एप्रिल २०१८ मध्ये आयसीसीने आपल्या सर्व सदस्यांच्या महिला संघांना १ जुलै २०१८ पासून महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला. पोर्तुगाल महिला संघाने मात्र आपला पहिला महिला टी२०आ सामना ७ एप्रिल २०२५ रोजी नॉर्वेविरुद्ध सांतारेम क्रिकेट मैदानावर खेळला. पोर्तुगालने तो सामना १६ धावांनी जिंकला.
नॉर्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना गमावल्यानंतर पोर्तुगालने तिसरा सामना ९ गडी राखून जिंकून आपली पहिली महिला टी२०आ मालिका २–१ अशा फरकाने जिंकली.
पोर्तुगाल राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?