२०२५ व्हायकिंग चषक ही ७ ते १० ऑगस्ट २०२५ दरम्यान स्टॉकहोम, स्वीडन येथे आयोजित करण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. स्वीडिश क्रिकेट महासंघाने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान स्वीडनसह ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि फ्रान्स या चार संघांनी सहभाग घेतला. सर्व आठ सामने स्टॉकहोम येथील बोटकिर्का क्रिकेट सेंटरवर खेळवण्यात आले.
प्रत्येक संघाने साखळी फेरीत इतर प्रत्येक संघाविरुद्ध एक सामना खेळला. गुणतालिकेतील पहिले दोन संघ अंतिम सामन्यासाठी, तर उर्वरित दोन संघ तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र ठरले. ऑस्ट्रियाने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून पहिले, तर नॉर्वेने दुसरे स्थान मिळवले. फ्रान्सने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात स्वीडनला दोन गडी राखून पराभूत केले.
ऑस्ट्रियाने अंतिम सामन्यात नॉर्वेला आठ गडी राखून पराभूत करत अपराजित राहून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रियाच्या बिलाल झलमईने स्पर्धेत सर्वाधिक १६२ धावा केल्या, तर त्याचा संघसहकारी उमैर तारिकने सर्वाधिक ११ बळी घेतले.
२०२५ व्हायकिंग चषक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.