२०२५ बुडापेस्ट चषक ही जुलै २०२५ मध्ये हंगेरीमध्ये आयोजित करण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेतील आठ सामने २५ ते २७ जुलै २०२५ दरम्यान जीबी ओव्हल, सोद्लिगेट येथे खेळवण्यात आले. यजमान हंगेरीसह ऑस्ट्रिया, रोमानिया आणि लक्झेंबर्ग या चार संघांनी स्पर्धेत भाग घेतला.
साखळी फेरीत ऑस्ट्रिया पहिल्या, तर रोमानिया दुसऱ्या स्थानावर राहिल्यामुळे दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. पावसामुळे अंतिम सामन्याचा निकाल लागू शकला नाही. साखळी गुणतालिकेत अव्वल राहिल्यामुळे ऑस्ट्रियाला स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले.
२०२५ बुडापेस्ट चषक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.