२०२६ व्हायकिंग चषक ही व्हायकिंग चषकाची दुसरी आवृत्ती होती. ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा ११ ते १४ जून २०२६ या कालावधीत स्टॉकहोम, स्वीडन येथील बोटकिर्का क्रिकेट सेंटरवर खेळवण्यात आली. या स्पर्धेत यजमान स्वीडन, फिनलंड, नॉर्वे आणि ऑस्ट्रिया या चार संघांनी भाग घेतला. साखळी फेरीनंतर तिसऱ्या स्थानाचा सामना आणि अंतिम सामना खेळवण्यात आला.
स्वीडनने अंतिम सामन्यात फिनलंडचा ९ गडी राखून पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. फिनलंडचा अमजद शेर मालिकावीर ठरला. नॉर्वेच्या चौधरी अक्रमने सर्वाधिक १३० धावा केल्या, तर बिलाल झलमई, अहमदुल्लाह शिनवारी, समीउल्लाह रहमानी आणि अब्दुल नासेर बलूच यांनी प्रत्येकी सर्वाधिक ८ बळी घेतले.
२०२६ व्हायकिंग चषक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?