२०२५ नॉर्वे तिरंगी मालिका ही १७ ऑगस्ट २०२५ रोजी ओस्लो, नॉर्वे येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेत यजमान नॉर्वे, तसेच स्वीडन आणि हंगेरी या तीन संघांनी भाग घेतला.
स्पर्धेतील सर्व तीन सामने ओस्लो येथील स्टुबरुडमायरा क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले. प्रत्येक संघाने इतर दोन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. नॉर्वेने आपले दोन्ही सामने जिंकून चार गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आणि स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. स्वीडनने दुसरे, तर हंगेरीने तिसरे स्थान मिळवले.
स्वीडनच्या सईद अहमदने स्पर्धेत सर्वाधिक १०५ धावा केल्या, तर त्याच संघाच्या समीउल्लाह रहमानीने सर्वाधिक ६ बळी घेतले.
२०२५ नॉर्वे तिरंगी मालिका
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?