२०२५ फिनलंड महिला तिरंगी मालिका ही १८ ते २० जुलै २०२५ या कालावधीत केरावा, फिनलंड येथे खेळवण्यात आलेली महिलांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. क्रिकेट फिनलंडने आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळवण्यात आले.
स्पर्धेत यजमान फिनलंड, एस्टोनिया आणि स्वित्झर्लंड यांच्या महिला संघांनी भाग घेतला. साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर दोन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. सहा साखळी सामन्यांनंतर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.
स्वित्झर्लंडने साखळी फेरीतील आपले चारही सामने जिंकून पहिले स्थान मिळवले, तर फिनलंडने दुसरे स्थान मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात स्वित्झर्लंडने फिनलंडचा १० गडी राखून पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
स्वित्झर्लंडच्या मेघना राजनने स्पर्धेत सर्वाधिक १३० धावा केल्या, तर मुंद्रा परिनिथाने सर्वाधिक सात बळी घेतले.
२०२५ फिनलंड महिला तिरंगी मालिका
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?