नॉर्वे महिला क्रिकेट संघाचा पोर्तुगाल दौरा, २०२५

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

नॉर्वे महिला क्रिकेट संघाचा पोर्तुगाल दौरा, २०२५

नॉर्वे राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी एप्रिल २०२५ मध्ये पोर्तुगालचा दौरा केला. सर्व सामने सांतारेम क्रिकेट मैदान, अल्बेर्गारिया येथे खेळवण्यात आले.

मालिकेतील पहिला सामना हा पोर्तुगाल महिला क्रिकेट संघाचा पहिला मटी२०आ सामना होता. पोर्तुगालने पहिला सामना १६ धावांनी जिंकला. नॉर्वेने दुसरा सामना ५ गडी राखून जिंकून मालिका १–१ अशी बरोबरीत आणली. पोर्तुगालने तिसरा सामना ९ गडी राखून जिंकत मालिका २–१ ने जिंकली. हा पोर्तुगाल महिला संघाचा पहिला मटी२०आ मालिका विजय होता.

पोर्तुगालची सारा फू-रायलंड हिने मालिकेत सर्वाधिक १२७ धावा केल्या. नॉर्वेची आयेशा हसन हिने आपल्या संघासाठी सर्वाधिक ८३ धावा केल्या. पोर्तुगालच्या गॅब्रिएला सिक्वेरा हिने मालिकेत सर्वाधिक ५ बळी घेतले आणि तिला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →