पोर्ट-औ-प्रिन्स (Port-au-Prince) ही हैती ह्या कॅरिबियन मधील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
गोनाव्हेचा अखातावर वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनाऱ्यावर आहेत. ह्या शहराची वस्ती २५ ते ३० लाख आहे. येथील बहुतांश लोक झोपड्यांमध्ये राहतात.
जानेवारी १२, २०१० रोजी घडलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये हे शहर जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या ह्या भूकंपामुळे पोर्ट-औ-प्रिन्समधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत तर इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पोर्ट-औ-प्रिन्स
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.