ॲना मेरी "पॅटी" ड्यूक (१४ डिसेंबर १९४६ - २९ मार्च २०१६) एक अमेरिकन अभिनेत्री होती. तिच्या अभिनय कारकिर्दीत, तिला एक अकादमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, तीन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार आणि हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर स्टार मिळाले होते.
वयाच्या १५ व्या वर्षी, ड्यूकने द मिरॅकल वर्कर (१९६२) या चित्रपटात हेलन केलरची भूमिका केली. हीच भूमिका तिने आधी ब्रॉडवेवर साकारली होती. तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला ज्यात ॲन बँक्रॉफ्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तिच्या ॲन सलिव्हानच्या भुमिकेसाठी. पुढच्या वर्षी, तिने तिच्या स्वतःच्या नेटवर्क दूरचित्रवाणी मालिका द पॅटी ड्यूक शो (१९६३-१९६६) मध्ये जुळे कॅथी आणि पॅटी लेनची दुहेरी भूमिका साकारली. व्हॅली ऑफ द डॉल्स (१९६७) या चित्रपटातील नीली ओ'हारा आणि मी, नॅताली (१९६९) चित्रपटातील नॅताली मिलर यासारख्या अधिक परिपक्व भूमिकांकडे तिने प्रगती केली. मी, नॅताली साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. १९८५ ते १९८८ पर्यंत तिने स्क्रीन ॲक्टर्स गिल्डच्या अध्यक्षा म्हणून काम केले.
ड्यूक यांना १९८२ मध्ये द्विध्रुवीय विकार असल्याचे निदान झाले. तिच्या निदानानंतर, तिने आपला बराचसा वेळ लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी वकिली करण्यात आणि शिक्षित करण्यासाठी दिला. ती अधूनमधून गायिका आणि लेखिकाही होती.
पॅटी ड्यूक
यामागील विज्ञान आणि इतिहास.