जॉन वेन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जॉन वेन

मॅरियन रॉबर्ट मॉरिसन (२६ मे १९०७ - ११ जून १९७९), जो व्यावसायिकरित्या जॉन वेन म्हणून ओळखला जातो आणि " द ड्यूक " टोपणनाव होते, एक अमेरिकन अभिनेता होता जो त्याच्या भूमिकांद्वारे लोकप्रिय झाला होता. हॉलिवूडच्या सुवर्णयुगात तयार झालेले चित्रपट, विशेषतः पाश्चात्य आणि युद्ध चित्रपटांमध्ये त्याने काम केले. १९२० च्या मूक युगापासून अमेरिकन न्यू वेव्हच्या माध्यमातून त्यांची कारकीर्द बहरली, व तो एकूण १७९चित्रपट आणि दूरदर्शन निर्मितीमध्ये दिसला. १९९९ मध्ये, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने क्लासिक अमेरिकन सिनेमातील एक महान पुरुष स्टार म्हणून वेनची निवड केली.

ट्रू ग्रिट (१९६९) मधील कामासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर ऑरस्कार मिळाला. वेनने १९७९ मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात शेवटची उपस्थीती दाखवली आणि दोन महिन्यांनंतर पोटाच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. १९८० मध्ये, त्यांना मरणोत्तर प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम, हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →