जॉन स्लॅटरी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जॉन स्लॅटरी

जॉन एम. स्लॅटरी जुनियर (जन्म १३ ऑगस्ट १९६२) एक अमेरिकन अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. एएमसी नाट्य मालिका मॅड मेन (२००७-१५) मधील रॉजर स्टर्लिंग या भूमिकेसाठी तो ओळखला जातो, ज्यासाठी त्याला ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी चार वेळा नामांकन मिळाले होते. त्याच्या भूमिकेसाठी त्याने दोन क्रिटिक्स चॉईस टेलिव्हिजन पुरस्कार आणि दोन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकले आहे.

चित्रपट स्पॉटलाइट (२०१५) मधील बेन ब्रॅडली, जुनियर आणि मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स चित्रपटातील हॉवर्ड स्टार्कच्या भूमिकेसाठीही तो ओळखला जातो ज्यात अनेक चित्रपट आहे:आयर्न मॅन २ (२०१०), अँट-मॅन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर (२०१६), आणि ॲव्हेंजर्स: एंडगेम (२०१९).

स्लॅटरीच्या प्रमुख मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत जसे कीहोमफ्रंट (१९९१-९३), मॅगी (१९९८-९९), जॅक अँड बॉबी (२००४-०५), डेस्परेट हाऊसवाइव्हज (२००४-०७), ३० रॉक (२०१०), अरेस्टेड डेव्हलपमेंट (२०१३) आणि द गुड फाईट (२०२२).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →