पृथ्वीराज कपूर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पृथ्वीराज कपूर

पृथ्वीराज कपूर हे नाटकांत व चित्रपटांमध्ये काम करायचे. त्यांचे तीनही मुलगे अभिनेता राज कपूर, ‘याहू’ स्टार शम्मी कपूर आणि यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले.

पृथ्वीराज कपूर (जन्म : (३ नोव्हेंबर १९०६; - २९ मे १९७२) हे हिंदी सिनेमा आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पृथ्वीराज यांनी मूकपटात आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय जन नाट्य संघ (Indian People's Theatre Association-IPTA-इप्टा) याच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. पृथ्वीराजांनी १९४४ मध्ये मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली. ह्या नाटक कंपनीची नाटके संपूर्ण देशभरात होत होती. भारतीय सिनेमाक्षेत्रात पुढे नामांकित झालेल्या कपूर खानदानाची ही सुरुवात होती..

पृथ्वीराज यांनी त्यांच्या पेशावर पाकिस्तान मधील एडवर्ड कॉलेजमधून उच्च शिक्षण मिळाले. त्यांनी एक वर्षासाठी कायद्याचे शिक्षण घेतले ज्यानंतर ते थिएटर विश्वात गेले. १९२८ मध्ये मुंबई येथे त्यांचे आगमन काही मूकपटांमध्ये काम केल्यानंतर झाले. त्यांनी भारतातील पहिला श्राव्य चित्रपट 'आलम आरा' मध्ये एक प्रमुख भूमिका बजावली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →