शशी कपूर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

शशी कपूर

शशी कपूर तथा बलबीरराज कपूर (१८ मार्च, १९३८ - ४ डिसेंबर, २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. पृथ्वीराज कपूर यांचे वडील तर राज कपूर आणि ऋषी कपूर यांचे भाऊ होते.

शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी १९४८मधील आग आणि १९५१मधील आवारा चित्रपटांत भूमिका केल्या. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.

२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →