पिएरो दि कोसिमो दे मेदिची

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

पिएरो दि कोसिमो दे मेदिची

पिएरो दि कोसिमो दे मेदिची तथा संधिवाती पिएरो (पिएरो इल गोत्तोसो), (१९ सप्टेंबर, १४१६ – २ डिसेंबर, १४६९) इटालियन रिनैसाँ काळात १४६४ ते १४६९ दरम्यान इटलीतील फिरेंझेचा अनभिषिक्ते शासक होता. हा आपल्या घराण्याच्या बांको दै मेदिचीचा मालक आणि मुख्याधिकारीही होता.

पिएरो हा कोसिमो दे मेदिची आणि त्याची पत्नी काँतेस्सिना दे बार्दी सर्वात मोठा मुलगा होता. तो लहानपणापासून संधिवाताने ग्रस्त होता आणि त्यामुळे कोसिमो हयात असे पर्यंत त्याने व्यवसाय किंवा राजकारणात फारसे लक्ष घातले नाहीत त्याचा लहान भाऊ जियोव्हानी हा कोसिमोचा वारस होणार असे दिसत होते परंतु कोसिमोच्या आधीच जियोव्हानी मृत्यू पावला व पिएरोला कोसिमोनंतर फिरेंझे आणि बांको दै मेदिचीची सूत्री सांभाळणे भाग पडले. त्याच्या आजारामुळे त्याला घराबाहेर फारसे पडता येत नव्हते. त्यामुळे त्याची खोली हीच त्याचे कार्यालय झाले व तेथे झालेल्या राजकीय बैठकांतून फिरेंझेचे शासन चाले. पर्यायाने मेदिची महाल हेच तेथील शासनाचे केंद्र झाले.

पिएरो १४६९मध्ये संधिवात आणि फुफ्फुसाच्या आजारामुळे मृत्यू पावला. त्याला त्याचा भाऊ जियोव्हानीच्या शेजारी बेसिलिका दि सान लॉरेंझोमध्ये पुरण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →