कोसिमो दे मेदिची

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कोसिमो दे मेदिची

कोसिमो दि जियोव्हानी दे मेदिची (२७ सप्टेंबर, १३८९ - १ ऑगस्ट, १४६४) हा मध्ययुगीन इटलीमधील बँकर आणि राजकारणी होता. याने इटालियन रिनैसाँ काळात फिरेंझे शहर आणि प्रजासत्ताकात मेदिची घराण्याची सत्ता स्थापन केली. त्याने आपल्या सावकारी आणि बँकव्यवसायातून मिळवलेल्या संपत्तीच्या बळावर आणि इतर श्रीमंत कुटुंबांशी लग्नांद्वारे आपली सत्ता स्थापली आणि मजबूत केली. सत्ता आणि राजकारणाशिवाय कोसिमोने आपला पैसा चित्रकला, शिल्पकला, संगीत, शिक्षण आणि वास्तुकलेतील कलावंताना आश्रय देण्यात खर्च केला. त्याने यात ६,००,००० फ्लोरिन (२०२४ चे सुमारे ५,००० कोटी रुपये) खर्च केले.

फिरेंझेवरील कोसिमोची पूर्ण सत्ता असली तरी ती निरंकुश नव्हती. त्याचे समकालीन राजकारणी त्याला हुकुमशहा नव्हे तर अग्रगण्य नागरिक मानत फ्लॉरेन्सच्या विधान परिषदेने त्याच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्याच्या अनेक प्रस्तावांना विरोध केला होता आणि त्यातून त्याने मार्ग काढले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →