जियोव्हानी दे मेदिची तथा जियोव्हानी दि पिएरफ्रांचेस्को दे मेदिची किंवा जियोव्हानी इल पोपोलानो (सामान्य जियोव्हानी) (२१ ऑक्टोबर, १४६७:फिरेंझे, इटली - १४ सप्टेंबर, १४९८) हा पंधराव्या शतकातील इटलीमधील फिरेंझेच्या मेदिची घराण्याचा सदस्य होता. हा पिएर फ्रांचेस्को दि लॉरेंझो दे मेदिचीचा मुलगा होता आणि त्याद्वारे कुटुंबाच्या धाकल्या पातीचा सदस्य होता.
जियोव्हानी आणि त्याचा भाऊ लॉरेंझो (इल पोपोलानो) हे १४७६मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे चुलत भाऊ जुलियानो आणि लॉरेंझो (इल मॅग्निफिको) यांच्या आश्रयास गेले. तेथे त्यांना मार्सिलियो फिसिनो आणि अँजेलो पॉलिझियानो यांसारख्या मानवतावाद्यांकडून शिक्षण मिळाले. त्यांच्यात शास्त्रीय अभ्यास आणि पुस्तकांची आवड निर्माण झाली. त्यांनी नंतर हस्तलिखिते आणि कोडेक्सचे एक मोठी ग्रंथालय स्थापले तयार केली.
काही काळाने आर्थिक कारणांस्तव त्यांचे लॉरेंझो इल मॅग्निफिकोशी संबंध बिघडले. लॉरेंझोने या दोघांचा वारसा त्यांच्या नावाने न ठेवता आपल्या नावे करून घेणे हे प्रमुख कारण होते. लॉरेझो इल मॅग्निफिकोच्या मृत्यूनंतर ते त्याच्या उत्तराधिकारी, पिएरो (इल फातुओ)वर उलटले. पिएरोने त्यांना एप्रिल १४९४ मध्ये हद्दपार केले.
पुढील नोव्हेंबरमध्ये जियोव्हानी आणि त्याचा भाऊ लॉरेंझो फ्रान्सच्या चार्ल्स आठव्याने इटलीवर केलेल्या आक्रमणाबरोबर फिरेंझेला परतले. त्यावेळी कारण शहरातील प्रजासत्ताकवाद्यांनी पिएरोची हकालपट्टी केली होती. गिरोलामो साव्होनारोला आणि त्याने पुकारलेल्या बंडाला समर्थन दिल्यामुळे या भावांना पोपोलानो ("सामान्य", "साधारण") टोपणनाव मिळाले.
पूर्वी जियोव्हानीचे लग्न लॉरेंझो इल मॅग्निफिकोची मुलगी लुइसा दे मेदिचीशी ठरले होते परंतु ती १४८८ मध्ये वयाच्या ११व्या वर्षी मरण पावली. १४९७मध्ये जियोव्हानीने कॅटरिना स्फोर्झाशी लग्न केले.
जियोव्हानी इल पोपोलानो वयाच्या ३०व्या वर्षी मृत्यू पावला.
जियोव्हानी इल पोपोलानो
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.