पाकिस्तान क्रिकेट संघाने ऑक्टोबर-डिसेंबर १९५२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. इसवी सन १९४७ मध्ये अखंड भारताची फाळणी झाल्यामुळे पाकिस्तान देशाकरता नव्या संघाची स्थापना झाली. परंतु स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानला कसोटी दर्जा देण्यात आला नव्हता. इसवी सन १९५१ मध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर पाकिस्तानसोबत इंग्लंडने प्रथम-श्रेणी सामने खेळले. जून १९५२ मध्ये भारताने आयसीसीकडे पाकिस्तानला कसोटी दर्जा द्यावा अशी विनंती केली. स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू भारताकडून कसोटी खेळल्याने आयसीसीने पाकिस्तानला कसोटी दर्जा बहाल केला.
बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संमतीने पाकिस्तान संघ आपल्या पहिल्या वहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतात पोहोचला. अब्दुल कारदार ज्याने स्वातंत्र्यापुर्वी भारताकडून कसोटी सामने खेळले त्याने या दौऱ्यात पाकिस्तानचे नेतृत्व केले. कसोटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्याच कसोटीत पहिला वहिला विजय मिळवला. पाकिस्तानने या दौऱ्यात ७ प्रथम-श्रेणी सराव सामने देखील खेळले.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९५२-५३
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.