२०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभेच्या २९४ सदस्यांची निवड करण्यासाठी
घेण्यात आली.
२३ एप्रिल व २९ एप्रिल ह्या दोन टप्प्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमधील २९३ मतदारसंघांसाठी मतमोजणी ४ मे २०२६ रोजी करण्यात आली. ह्या निवडणुकीत ९२.९३% मतदानाची ऐतिहासिक नोंद झाली, जी २०११ च्या निवडणुकीला मागे टाकणारी राज्यातील आतापर्यंतची सर्वाधिक टक्केवारी आहे.
सलग १५ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसला ह्या निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शुभेंदू अधिकारी ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने २०६ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी ह्यांचा कोलकाता शहरातील भावानीपूर येथून पराजय झाला.
ह्या निवडणुकीमधील मोठ्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडली. पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी तसेच पक्षनेते अभिषेक बॅनर्जी ह्यांच्या कर्यपद्धतीवर तीव्र् असंतोष व्यक्त करून पक्षाचे अनेक विद्यमान विधानसभा तसेच लोकसभा सदस्य तृणमूल काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. लोकसभेमधील २८ पैकी २० खासदार त्रिपुरा येथे स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट सिटीझेन्स पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. तसेच राज्यसभेच्याही ४ सदस्यांनी राजीनामा दिला.
नवनिर्वाचित ८० आमदारांपैकी ६५ आमदारांनी रिताब्रता बॅनर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये एक वेगळा गट स्थापन केला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०२६
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.