पलंगका राया

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पलंगका राया

पलंगका राया हे इंडोनेशियाच्या मध्य कालीमंतान प्रांताची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बोर्नियो बेटावर कहायान आणि सबांगाऊ नद्यांच्या मध्ये वसलेले आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या २,९३,५०० होती तर २०२०मधील अधिकृत अंदाज ३,०५९०७ होता. यांत १,५५,४९६ पुरुष आणि १,५०,४११ स्त्रीया होत्या. पलांगका राया हे इंडोनेशियातील आकाराने सर्वात मोठे शहर आहे (जकार्ताच्या आकाराच्या अंदाजे चार पट). या शहराच्या आसपासचा प्रदेश दाट जंगलाने व्यापलेला आहे. यांतउत्तरेकडील राकुम्पिट आणि बुकिट बटू संरक्षित जंगले, निसर्ग संवर्धन क्षेत्रे आणि टांगकिलिंग जंगलासह).



पलंगका राया हे नाव दयाक न्गाजू आणि संस्कृत या दोन भाषांतून तयार झाला आहे. दयाक भाषेत पलंगकाचा अर्थ पवित्र स्थान होतो व पलंगका रायाहे विशाल पवित्र स्थळ असल्याचे नावातून सूचित होते. या शहराच्या ठिकाणी पूर्वी दाट जंगलात पहांडुत नावाचे छोटे दयाक गाव होते



जंगले आणि पाणी, चिखल आणि खारजमिनीने वेढलेल्या शहरावर नेहमी धुके पडते. याशिवाय जंगलातील वणवे आणि दलदलीतील वायु यांमुळे येथील हवा अनेकदा धूसर होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →