पोंतियानाक किंवा खुंटिएन हे इंडोनेशियाच्या पश्चिम कालीमंतान प्रांतातीलची राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर आहे. चिनी भाषेत पोंतियानाकला 坤甸, ( पिनयिन ): कुंडियन ) तर स्थानिक हक्का चायनीजमध्ये, पोंटियानॅकला खुंटीन या नावाने ओळखले जाते.
हे शहर बोर्नियो बेटावर कपुआस नदीच्या त्रिभुज प्रदेशात कपुआस आणि लांदक नदीच्या संगमावर वसलेले आहे. हे शहर विषुववृत्तावर असल्याने त्यालाकोटा खातुलिस्टिवा (विषुववृत्तीय शहर) असेही म्हणतात. पोंतियानाक हे इंडोनेशियातील २६ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून सामरिंद, बालिकपपन, कुचिंग आणि बंजारमसिन नंतर कालीमंतान बेटावरील पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. २०२२ च्या अंदाजानुसार येधील लोकसंख्या ६,६९,७९५ होती.
पोंतियानाक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?