पर्यावरण सेवा योजना

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शालेय स्तरावर 'पर्यावरण' विषय अनिवार्य करण्यात आला आहे. परंतु, हा विषय केवळ वर्गामध्ये न शिकवता निसर्गाच्या सानिध्यात प्रत्यक्ष कृतीच्या आधारे या विषयाबद्दल मुलांच्या मनात जागृती व चेतना निर्माण करून, बालपणापासूनच असे आधारस्तंभ तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून भावी पिढी 'पर्यावरण संवेदनशील व सजग होईल. करीता याच उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 'पर्यावरण सेवा योजना (Environmental Service Scheme (ESS)) राबविण्याचा निर्णय १४ जानेवारी, २०११ रोजी शासनाने घेतला आहे. या सर्व उपक्रमांमध्ये स्थानिक जनतेचा विद्यार्थ्याबरोबर सहभाग असेल. याद्वारे मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन पर्यावरणविषयक स्थानिक समस्यांवर उपाययोजना शोधण्याची क्षमता निर्माण करण्याबरोबरच, पर्यावरण संवर्धनाचे काम नियमितपणे सुरू राहील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →