राज्य वातावरणीय कृती कक्ष पर्यावरणातील वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासनाचा पर्यावरणाच्या रक्षणासाठी कार्य करणार उपक्रम आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग पर्यावरण विषयक विविध अधिनियमांच्या अंमलबजावणी बरोबरच वातावरणीय बदल अनुकुल धोरणाची अंमलबजावणी करणे, जैवविविधता आणि वातावरणाचा समतोल राखण्यासाठी नैसर्गिक जलस्त्रोतांचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच, शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे इत्यादी कार्य करीत आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत मंत्रालयस्तरावर असलेल्या सध्याच्या यंत्रणेमार्फत पर्यावरण विषयक विविध अधिनियमांची अंमलबजावणी कालमर्यादेत करण्यात येत असून त्यासाठी विभागात उपलब्ध असेलेल्या मनुष्यबळाचा वापर करण्यात येत आहे. परंतु, विभागाचे नामबदल झाल्यानंतर वातावरणीय बदल अनुकुल धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र असा अधिकारी व कर्मचारीवृंद उपलब्ध नाही. तथापी, वातावरणीय बदल अनुकुल धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे, वातावरणीय बदल अनुकुल धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर “राज्य वातावरणीय कृती कक्ष (State Climate Action Cell (SCAC)) ” निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या सर्व बाबींचा विचार करून वातावरणीय बदल अनुकूल धोरणांची अमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अंतर्गत “राज्य वातावरणीय कृती कक्ष महाराष्ट्र शासन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, शासन निर्णय, क्रमांक : वाकृक- २०२३ / प्र.क्र. ५४ /तां.क. १, दिनांक : ९ ऑगस्ट, २०२३ नुसार निर्माण करण्यास व त्याकक्षासाठी खाली नमूद केलेला अधिकारी व तज्ञ यांची पदे तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यास्तरावर निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली.
राज्य वातावरणीय कृती कक्ष (महाराष्ट्र)
यामागील विज्ञान आणि इतिहास.