शासनाची एकात्मिक बाल विकास सेवा योजना विविध शासकीय विभाग व सामाजिक संस्था यांच्या अभिसरणाद्वारे राबविणे हे योजनेच्या उद्दिष्टातच आहे. या योजनेचे उद्दिष्ट लोकसहभागाद्वारे योजनेचे बळकटीकरण करून साध्य करता येईल. या योजनेच्या सफलतेसाठी अंगणवाडी केंद्र सक्षम होणे आवश्यक असल्याची बाब विचारात घेऊन अंगणवाडी दत्तक धोरण (Adoption of Anganwadi) शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेची सुरुवात महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी ४ ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या परिपत्रकाद्वारे केली.
केंद्र शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांच्या सुधारणेसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी व सुविधांच्या व्यतिरीक्त लोकसहभाग देखील अत्यंत महत्वाचा आहे, केंद्र शासनाने सांगितले होते.
अंगणवाडी दत्तक धोरण (महाराष्ट्र)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!