परमहंस सभा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ३१ जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली.

या सभेच्या स्थापनेत भिकोबादादा चव्हाण, रामचंद्र बाळकृष्ण जयकर या मंडळींची मदत झाली व अध्यक्ष राम बाळकृष्ण जयकर होते.

परमहंस सभा ही गुप्त सभा होती. समाजावर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव होता. तिचे काम गुप्तपणे चाले. पण फार काळ ही चालू शकली नाही कारण सभेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. त्यामुळे समाजाच्या भीतीने तिचे काम थांबले.

परमहंस सभेचे संस्थापक: दुर्गादास मंच्छाराम व दादोबा पांडुरंग

सभेचे अध्यक्ष : राम बाळकृष्ण जयकर

परमहंस या शब्दाचा उल्लेख दादोबा पांडुरंग यांच्या 'माबाईच्या ओव्या' या पुस्तकात सर्वप्रथम आढळतो. धर्मातील सार घेणारा तो परमहंस असा त्याचा अर्थ आहे.

परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कासमभाई महमदजी ढालवाणी

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →