न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९८८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडने प्रथमच भारतामध्ये एकदिवसीय मालिका खेळली. या आधी १९८७ क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडने भारतात एकदिवसीय सामने खेळले होते परंतु द्विपक्षीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने पहिल्यांदा भारतात खेळली. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका भारताने अनुक्रमे २-१ आणि ४-० अशी जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८८-८९
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.