भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८१ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० अशी जिंकली. दौरा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात भारतीय संघाने फिजीसोबत दोन-दिवसीय सामना खेळला ज्यात भारताने फिजीचा २२० धावांनी पराभव केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८०-८१
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?