न्यू झीलंड क्रिकेट संघाने तीन कसोटी सामने खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविली गेली. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीच्या दरम्यान इंग्लंड संघाने नेदरलँड्समध्ये तीन वनडे सामने खेळले. एप्रिल २०२२ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव झाल्यामुळे ज्यो रूटने इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदावरून राजीनामा दिला. बेन स्टोक्स याला इंग्लंडच्या कर्णधारपदी नियुक्त केले गेले.
कसोटी मालिकेआधी न्यू झीलंडने दोन सराव सामने खेळले. पहिली कसोटी इंग्लंडने जिंकत मालिकेत दणक्यात सुरुवात केली. चौथ्या डावात माजी कर्णधार ज्यो रूट याने शतक झळकावण्यासोबतच कसोटी क्रिकेट मध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० ने जिंकली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२२
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?