इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इंग्लंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२०-२१

इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली. वेळेपत्रकानुसार ही मालिका मार्च २०२० मध्ये होणार होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या फैलावामुळे इंग्लंड संघ सराव सामना चालु असतानाच इंग्लंडला परतला. त्यामुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांनी ही मालिका जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केली.

दिमुथ करुणारत्नेला दुखापत झाल्याने पहिला कसोटीत श्रीलंकेचे कर्णधारपद दिनेश चंदिमलकडे देण्यात आले. ज्यो रूटच्या उत्तम अश्या २२८ धावांच्या खेळीमुळे पहिल्या कसोटीत इंग्लंडने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. ज्यो रूटची २२८ ही खेळी इंग्लंडच्या फलंदाजाने श्रीलंकेत केलेल्या सर्वोच्च धावा होत्या. दुसऱ्या कसोटीसाठीसुद्धा करुणारत्ने बरा नाही होऊ शकल्याने दिनेश चंदिमललाच कर्णधार नेमण्यात आले. इंग्लंडने दुसरी कसोटी देखील ६ गडी राखत जिंकली आणि कसोटी मालिकेमध्ये २-० असा विजय मिळवला. इंग्लंडने सलग पाचव्यांदा परदेशात कसोटी मालिका जिंकली, तर ह्या सलग ज्या पाच मालिका जिंकल्या त्या १९१३-१४ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतरचा सर्वोत्तम विजयी मालिका आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →