न्युर्नबर्ग (जर्मन: Nürnberg, इंग्लिश उच्चारः न्युरेम्बर्ग, Nuremberg) हे जर्मनीच्या बायर्न राज्यामधील एक शहर आहे. न्युर्नबर्ग फ्रांकोनिया ह्या भौगोलिक क्षेत्रात म्युनिक शहराच्या १७० किमी उत्तरेस पेग्निट्झ नदीच्या काठावर वसले आहे.
११व्या शतकात स्थापन झालेले न्युर्नबर्ग पवित्र रोमन साम्राज्यामधील एक महत्त्वाचे स्थान होते. साम्राज्याची संसद व न्यायालय न्युर्नबर्गच्या किल्ल्यात भरत असत. १३व्या शतकात न्युर्नबर्ग हे युरोपमधील एक मोठे व्यापार केंद्र होते. नाझी जर्मनीच्या कालावधीत न्युर्नबर्ग हे अॅडॉल्फ हिटलरचे एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी केंद्र होते. हिटलरने ज्यूविरोधाचे कायदे मंजूर करण्याकरिता राइचश्टागला न्युर्नबर्ग येथे बैठक घेण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये न्युर्नबर्गची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. युद्ध संपल्यानंतर होलोकॉस्ट व इतर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या नाझी लष्करी अधिकाऱ्यांवर न्युर्नबर्ग येथेच खटले भरण्यात आले होते.
सध्या न्युर्नबर्ग हे जर्मनीमधील एक मोठे व्यापारी व औद्योगिक शहर आहे. अनेक महामार्ग येथे येउन मिळत असल्याने व आपल्या भौगोलिक स्थानामुळे पूर्व व मध्य युरोप सोबत जर्मनीच्या व्यापाराचे न्युर्नबर्ग हे महत्त्वाचे केंद्र आहे.
न्युर्नबर्ग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!