क्योल्न (जर्मन: Köln; इंग्लिश वापर: Cologne; कोलोन) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील सर्वात मोठे तर जर्मनीमधील बर्लिन, हांबुर्ग व म्युनिक खालोखाल चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागातील रूर परिसरामध्ये ऱ्हाइन नदीच्या काठावर वसलेल्या क्योल्नची लोकसंख्या सुमारे १० लाख आहे. येथील क्योल्नर डोम नावाच्या कॅथेड्रलसाठी प्रसिद्ध असणारे क्योल्न ऱ्हाइनलॅंड परिसरामधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
अंदाजे पहिल्या शतकादरम्यान वसवल्या गेलेल्या क्योल्नवर इतिहासामध्ये अनेकदा फ्रेंचांनी व ब्रिटिशांनी सत्ता गाजवली. मध्य युगादरम्यान आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तरेकडील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी व वाहतूक केंद्रांपैकी एक असलेले क्योल्न हान्से संघामधील आघाडीचे शहर होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून केल्या गेलेल्या असंख्य बॉंबहल्ल्यांदरम्यान क्योल्नची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. युद्ध संपल्यानंतर जर्मन सरकारने येथील अनेक ऐतिहासिक वास्तू पुन्हा बांधण्याचे प्रयत्न केले.
सध्या क्योल्न जर्मनीमधील एक आघाडीचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.
क्योल्न
या विषयातील रहस्ये उलगडा.