नौकरी हा १९५४ मध्ये बिमल रॉय यांनी बिमल रॉय प्रॉडक्शनसाठी दिग्दर्शित केलेला भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. ह्यात मुख्य कलाकार किशोर कुमार आणि शीला रमाणी होते. हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात शहरात रोजगारासाठी संघर्ष करताना शिक्षित तरुणांच्या स्वप्नांचा आणि आकांक्षांचा चुराडा होण्याबद्दलची कथा सांगत आहे. नौकरी आणि बाप बेटी (१९५४) हे रॉय यांचे "संवेदनशील" आणि "संस्मरणीय" चित्रपट म्हणून उल्लेखले जातात. ह्यामध्ये, रॉय यांनी बेरोजगारी या सामाजिक समस्येचा सामना केला आहे. किशोर कुमार यांना पहिल्यांदाच महत्त्व मिळालेल्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी हा एक आहे. त्यांचे विनोदी व्यक्तिमत्त्व अद्याप पूर्णपणे विकसित झाले नसल्यामुळे, ह्या चित्रपटात त्याच्याकडून एक प्रामाणिक, संवेदनशील आणि संयमी अभिनय कामगिरी पाहायला मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नौकरी (१९५४ चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.