नीरजा भनोत पुरस्कार

या विषयावर तज्ञ बना.

नीरजा भनोत पुरस्कार हा भारतातील नीरजा भनोत-पॅन ॲम ट्रस्टतर्फे वर्षातून एकदा देशातील अशा महिलेला दिला जाणारा सन्मान आहे, जिने सामाजिक अन्यायाचा धैर्याने आणि निर्धाराने सामना केला आहे आणि तशाच परिस्थितीत असलेल्या इतर महिलांना मदतीचा हात दिला आहे.

वार्षिक नीरजा भानोत पुरस्काराची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. सप्टेंबर १९८६ मध्ये पाकिस्तानातील कराची विमानतळ येथे पॅन ॲम फ्लाइट ७३ च्या विमान अपहरणादरम्यान स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वरिष्ठ विमान परिचारिका नीरजा भनोत यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारात १.५ लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि ट्रॉफी (स्मृतीचिन्ह) यांचा समावेश असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →