नीरजा भनोत

या विषयावर तज्ञ बना.

नीरजा भनोत

नीरजा भानोत (सप्टेंबर ७, इ.स. १९६३:चंदिगढ, भारत - सप्टेंबर ५, इ.स. १९८६:कराची, पाकिस्तान) , ही पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील विमानप्रवास सेविका होती. सप्टेंबर ५, इ.स. १९८६ रोजी झालेल्या पॅन ॲम ७३ विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला. नीरजा भानोत ही एक भारतीय विरांगना होती. तिने १९८६ साली जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचविले आणि ते करताना वयाच्या २३ वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हाे वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली. तिला (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक चक्र मिळालेलीही ती सर्वात तरुण व्यक्ती आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →