ऑपरेशन चॅस्टाइझ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ऑपरेशन चॅस्टाइझ

ऑपरेशन चॅस्टाइझ हे दुसऱ्या महायुद्धदरम्यान १६-१७ मे १९४३च्या रात्रीत ब्रिटनच्या रॉयल एरफोर्सतर्फे जर्मनीच्या धरणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या कारवाईचे सांकेतिक नाव होते. या मोहिमेचे वैशिष्ट्य हे की खास या मोहिमेसाठी प्रथमच उसळणाऱ्या बॉंब (bouncing bomb)चा वापर क‍रण्यात आला. या विशिष्ट रचनेच्या बॉंबमुळेच ही कारवाई यशस्वी ठरली. लक्ष्यावर आदळल्यावर लगेच स्फोट न होता, उसळ्या घेत काही अंतर कापून फुटणारा हा बॉंब बार्न्स वॉलिस यांनी शोधला व विकसित केला होता. या कारवाईअंतर्गत मॉहने धरण आणि एडरसी धरण उध्वस्त झाले तर सोर्पे धरणास जुजबी नुकसान झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →