निकोबारी लोक हे निकोबार बेटांतील ऑस्ट्रोएशियाटिक भाषिक लोक आहेत. निकोबर बेटे ही सुमात्राच्या उत्तरेस, बंगालच्या उपसागरातील बेटांची साखळी आहे. ही बेटे भारतातील अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा भाग आहे. या द्वीपसमूहातील सर्वात मोठे आणि मुख्य बेट ग्रेट निकोबार आहे. या द्वीपसमूहात एकूण १९ बेटे आहेत, त्यापैकी फक्त १२ बेटांवर लोकवस्ती आहे. निकोबार बेटावरील प्रमुख जमातींना सूचित करण्यासाठी निकोबारी हा शब्द वापरण्यात येतो. प्रत्येक बेटावर, लोकांना / जमातींना विशिष्ट नावे आहेत, परंतु एकत्रितपणे ते निकोबारी म्हणून ओळखले जातात. येथील लोकं, स्वतःला होल्चू म्हणतात, या शब्दाचा अर्थ "मित्र" असा आहे.
निकोबारी लोकांचा समावेश भारतीय संविधानानुसार अनुसूचित जमातीं मध्ये केलेला आहे.
निकोबारी लोक
यामागील विज्ञान आणि इतिहास.