अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

या विषयातील रहस्ये उलगडा.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह किंवा अंदमान आणि निकोबार बेटे हा ५७१ बेटे समाविष्ट असलेला एक भारतीय केंद्रशासित प्रदेश आहे. भारताच्या आग्नेयेस ही बेटे समाविष्ट आहेत. अंदमान बेटावरील श्री विजयपुरम शहर हे अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी आहे. निकोबारी व बंगाली येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी असून लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. येथील साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. तसेच येथे दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →