काळे पाणी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

काळे पाणी हे ब्रिटिश भारतातील भारतीय कैद्यांना अंदमानला जाऊन भोगायच्या जन्मठेपेच्या शिक्षेला मिळालेले प्रचलित नाव होते.

भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे बाराशे किलोमीटरवर अंदमान निकोबारची बेटे वसली आहेत. ५७२ बेटांचा हा समूह आहे.

पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी आहे. साधारणपणे बाराही महिने पडणाऱ्या पावसामुळे येथे हवामान दमट असते. ते रोगटही आहे अशा कल्पनेमुळे अंदमानला काळे पाणी म्हणत. भारतातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना ब्रिटिश सत्ताधीश अंदमानला आणून ठेवत. त्यासाठी त्यांनी येथे सेल्युलर जेल नावाचा तुरुंग बांधला. सन १८९६ ते १९०६ दरम्यान कैद्यांकडूनच सेल्युलर जेलची बांधणी करून घेतली गेली.

सेल्युलर जेलमध्ये ६९४ कोठड्या होत्या. कैद्यांचा एकमेकांशी संवाद होऊच शकणार नाही अशा पद्धतीने त्यांची उभारणी करण्यात आली होती. ह्या कोठड्या आकाराने अतिशय छोट्या आहेत. आजही भेदरवून टाकणारी अशी प्रत्येक कोठडीची बांधणी आहे. अशाच एका कोठडीत सावरकरांनी अकरा वर्षे अत्याचार भोगले होते, तसेच कमलासारखे काव्यही त्यांनी याच ठिकाणी लिहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →