कोको बेटे - हा बेटसमूह बंगालच्या उपसागरातील ईशान्य भागात आहे. ही बेटे १९३७ पासून म्यानमारच्या यंगून प्रदेशाचा भाग आहेत. ही बेटे यंगून शहराच्या दक्षिणेस ४१४ किमी (२५७ मैल) वर आहेत. या बेट समूहात एकूण पाच बेटे आहेत: यातील चार ग्रेट कोको रीफवर आणि एक लिटल कोको रीफवर आहे. या बेटसमूहाच्या उत्तरेस असलेले प्रीपेरिस बेट, म्यानमारचे आहे. तर दक्षिणेला असलेले लँडफॉल बेट, भारताचे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोको बेटे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?