निंगबो (चिनी: 宁波市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चच्यांग या प्रांतातले एक मोठे शहर व बंदर आहे. निंगबो शहर चीनच्या पूर्व भागात शांघायच्या २२० किमी दक्षिणेस तर हांगचौच्या १५० किमी आग्नेयेस पूर्व चीन समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०२० साली निंगबो महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ९४ लाख होती.
निंगबो चीनमधील १६ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांपैकी एक असून ते ह्या देशातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे. २०१८ साली येथील आर्थिक उलाढाल १९,१६८ कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी होती. येथील बंदर जगातील सर्वात वर्दळीचे बंदर आहे. हांगचौ-षेंचेन द्रुतगती रेल्वेमार्ग निंगबोमधूनच धावतो. येथाल ३५ किमी लांबीचा हांगचौ खाडी पूल हा समुद्रावर बांधण्यात आलेला जगातील सर्वाधिक लांबीच्या पूलांपैकी एक आहे.
निंगबो
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?