हेनान (देवनागरी लेखनभेद: हनान; चिनी लिपी: 河南 ; फीनयिन: Hénán) हा चीन देशाच्या मध्य-पूर्व भागातील एक प्रांत आहे. सुमारे ३२०० वर्षांचा इतिहास असलेला हा प्रांत चिनी संस्कृतीचे उगमस्थान मानला जातो. चीनच्या ८ प्राचीन राजधानीच्या शहरांपैकी ४ शहरे ह्याच प्रांतात स्थित आहेत. शाओलिन मंदिर तसेच जगातील सर्वाधिक उंच असलेला पुतळा स्प्रिंग टेंपल बुद्ध याच प्रांतात आहेत.
आजच्या घडीला हेनान प्रांत चीनमधील तिसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत असून २०२० साली येथील लोकसंख्या सुमारे ९.९३ कोटी इतकी होती. झेंगचौ हे हेनानच्या राजधानीचे व सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
हेनान
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.